मुंबई – जागतिक पातळीवर करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेलाची मागणी कमी होईल या शक्यतेमुळे कच्च्या तेलाचे दर कमी होत आहेत. सोमवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर साडेतीन टक्क्यांनी कोसळून 70.94 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले.
भारत आपल्या गरजेच्या तब्बल 80 टक्के इतके कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतर भारताची कच्च्या तेलाची आयात कमी होते. गेल्या अनेक महिन्यापासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असल्यामुळे भारताने चिंता व्यक्त केली होती आता भारताला अल्पकालीन का होईना दिलासा मिळाला आहे.