अॅडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अशेस कसोटी मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने एक अनोखी कामगिरी केली आहे. कसोटीत तब्बल शंभरवेळा नाबाद राहण्याचा विक्रम साकरला आहे.
या कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावात अँडरसन नाबाद राहिला होता. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 100 वेळा नाबाद राहण्याचा विक्रम अँडरसनच्या नावे झाला आहे. 167 व्या कसोटी सामन्यात त्याने हा पराक्रम आपल्या नावे नोंदवला आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावात अँडरसनने 13 चेंडूत 5 धावांची नाबाद खेळी केली. असा पराक्रम करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार कोर्टनी वॉल्श दुसऱ्या क्रमाकांवर आहे. तो कसोटी कारकिर्दीत 61 वेळा नाबाद राहिला आहे.
तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन आहे. तो 56 वेळा नाबाद राहिला आहे. इंग्लंडचा माजी कसोटीपटू बॉब विलिस कसोटी कारकिर्दीत 55 वेळा नाबाद राहिले आहेत.