बेंगळुरू – भारताचे माजी कसोटीपटू व समालोचक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकदामीच्या (एनसीए) संचालकपदाची सूत्रे स्वीकारली.
राहुल द्रविड यांची भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्यावर अकादमीचे हे पद रिक्त झाले होते.
लक्ष्मण यांची गेल्या महिन्यात बीसीसीआयने एनसीएच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली होती. मात्र, आता एनसीएचे संचालक बनलेल्या लक्ष्मण यांना यापुढे आयपीएलमध्ये कोणत्याही संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करू शकणार नाही.
हे पद स्वीकारण्यापूर्वी लक्ष्मण आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत होते. तसेच ते 6 वर्षे बंगाल क्रिकेट संघटनेचे क्रिकेट संचालकही होते.