लंडन – संपूर्ण जीवसृष्टीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सूर्याची ऊर्जा हा नेहमीच औत्सुक्याचा विषय झाला आहे. सूर्याच्या प्रखर आणि तीव्र उष्णतेमुळे अनेक उपग्रह क्षणात नष्ट होण्याचे अनुभव आत्तापर्यंत आले असतानाच आता सूर्याच्या उष्णते एवढ्या क्षमतेची ऊर्जा पृथ्वीवरच तयार करण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. तब्बल पाच करोड अंश सेल्सिअस तीव्रतेची ही ऊर्जा असणार आहे. ही ऊर्जा सूर्याच्या ऊर्जेच्या क्षमतेच्या दुप्पट मानली जात आहे. इंग्लंडमधील एका छोट्या शहरांमध्ये या प्रयोगाची प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे.
एका छोट्या प्रयोगशाळेमध्ये अशा प्रकारच्या ऊर्जेची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रयोगासाठी अर्थातच आण्विक शक्तीचा वापर जाणार आहे. पण या मार्गाने ऊर्जेची निर्मिती करत असताना कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही आणि कोणताही त्रास मला होणार नाही अशी ग्वाही देण्यात आली आहे.
आण्विक शक्ती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जर असा प्रकारे एखाद्या प्रयोगशाळेत ऊर्जेची निर्मिती करण्यात आली तर जगात सर्वत्र अशा प्रकारचे प्रयोग करून ऊर्जेची आणि विजेची टंचाई संपवण्यात येईल असा दावा शास्त्रज्ञ करत आहेत.
या प्रयोगात सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्रणा वापरण्यात येणार असल्याने अपघाताची शक्यता अतिशय कमी आहे. या प्रचंड क्षमतेच्या ऊर्जेचा संपर्कात कोण आले तर ती व्यक्ती अथवा वस्तू क्षणात जळून खाक होणार असली तरी या प्रयोगामुळे निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा संपर्कात प्रत्यक्षपणे कोणीही येणार नाही.
एका विशिष्ट साखळी प्रक्रियेच्या माध्यमातून या ऊर्जेची निर्मिती करण्यात येणार असल्याने कोणत्याही क्षणी काही शंका आल्यास निर्मिती बंद करण्याचा कंट्रोल राहणार आहे. सध्या हा प्रयोग कागदावरच असून त्याची प्राथमिक तयारी करण्यात येत आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये या छोट्या गावांमध्ये हा प्रयोग आकाराला येणार आहे. त्याचे प्रार्थमिक रिझल्ट समोर आले की हा प्रयोग यशस्वी झाला आहे की नाही हे समजणार आहे. जगभरातील सर्वच उर्जेवर काम करणाऱ्या संशोधकांसाठी ही एका उत्सुकतेची बाब ठरली आहे.