मुंबई – सध्या सर्वत्र शिवसेना नेते संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊतच्या लग्नाची चर्चा आहे. पूर्वशी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार आज लग्नबंधनात अडकत आहेत.
या शाही लग्नसोहळ्यासाठी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित लावली असून, या सोहळ्यातील काही खास फोटो समोर आले आहेत. काल पूर्वशी आणि मल्हार यांचा हळदी समारंभ पार पडला होता.
पूर्वशी-मल्हार यांच्या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. यावेळी शरद पवार हे त्यांच्या पत्नीसहीत लग्नाला हजर होते. लग्न लागण्याच्या मुहूर्तावरच शरद पवार हॉलवर पोहचले. तसेच माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलही या लग्नाला उपस्थित होते.
तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. काही दिवसांपूर्वीच स्वतः संजय राऊत राज यांना लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंच्या निवास्थानी गेले होते.
मल्हार यांचं औक्षण झाल्यानंतर राऊत यांनी आपल्या शेरवानीच्या खिशात हात घालून काही नोटा काढल्या. आणि मल्हार यांच्या डोक्यावरुन ओवाळून टाकल्या. पवईच्या हॉटेल रेंनीसांसमध्ये शाही विवाह सोहळा संपन्न झाला.