DYSP ने विनयभंग करुन चुकीचा गुन्हा नोंदवला; वकिल महिलेचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – मंत्रालयासमोर महिला वकिलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. येथील पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत या महिलेला आत्महत्या करण्यावाचून वाचवले आहे. या घटनेने मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडली आहे.

दौंडमधील पोलीस उपअधीक्षक (DYSP) ने विनयभंग करून चुकिचा गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने केला आहे. याशिवाय अनेकदा तक्रारी करून सुद्धा आपल्यावर झालेल्या अत्याचाराची दखल कुणीच घेत नाही. त्यामुळे या महिला वकिलाने थेट मंत्रायलयासमोर जाऊन आत्महत्या करण्याच प्रयत्न केला आहे.

हि महिला वकिल कोण आहे हे मात्र अद्याप कळू शकले नाही. येथील पोलिसांनी या महिलेस मरिन ड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.