वृत्तसंस्था – शुक्रवार आज पहाटे साडेपाच वाजता भारत-बांग्लादेश सीमेवर बांगलादेशच्या (भारत-म्यानमार सीमा क्षेत्र) १७५ किमी पूर्वेला ६.३ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. युरोपीय-भूमध्य भूकंप केंद्र (EMSC) ने यासंदर्भात पुष्टी केली आहे. पहाटे-पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. अनेकांनी यावेळी घराबाहेर पळ काढला आहे. या भूकंपाच्या घटनेमध्ये अद्याप किती नुकसान झाले हे समोर आले नाही.
An earthquake of magnitude 6.3 strikes 175 km E of Chittagong, Bangladesh (Myanmar-India border region) about 9 minutes ago: European-Mediterranean Seismological Centre (EMSC) pic.twitter.com/nePZp4elmD
— ANI (@ANI) November 26, 2021
मिझोराममध्ये भूकंप
मिझोरामध्ये सुद्धा आज पहाटे ५ वाजून १५ मिनीटांनी मिझोरामच्या थेनझॉलपासून ७३ किमी आग्नेय दिशेला ६.१ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याला दुजोरा दिला आहे.
An earthquake of magnitude 6.1 occurred today around 5:15 am at 73km SE of Thenzawl, Mizoram:
National Center for Seismology pic.twitter.com/Bz6dQf1SuJ— ANI (@ANI) November 26, 2021