मुंबई – आंतरराष्ट्रीय एमी ऍवॉर्डसची घोषणा झाली आहे. या पुरस्कारांसाठी भारतीय प्रेक्षक खूप आतूर झाले होते. कारण या ऍवॉर्डसाठी भारतातून एक नाही तर दोन सिनेमांना नामांकन मिळाले होते.
सुष्मिता सेनची वेबसिरीज “आर्या’, नवाजुद्दीन सिद्दीकीचा सिनेमा “सिरीयस मॅन’ बरोबर स्टॅन्ड अप कॉमेडियन वीर दासला देखील नामांकन मिळाले होते. “आर्या’ला बेस्ट ड्रामा सिरीज, “सिरीयस मॅन’मधील भूमिकेसाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला बेस्ट ऍक्टर आणि वीर दासला बेस्ट कॉमेडी या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले होते.
मात्र, दुःखाची गोष्ट अशी की या तिघांनाही आपापल्या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळू शकला नाही. बेस्ट ड्रामा सिरीज या श्रेणीमध्ये “तहरान’ला पुरस्कार मिळाला. तर वीर दासच्या बेस्ट कॉमेडीयनच्या कॅटेगरीमध्ये वीर दासच्या “फॉर इंडिया’ या कार्यक्रमाला मागे टाकून “कॉल माय एजंट सीजन 4′ ने बाजी मारली.
तर बेस्ट ऍक्टरच्या श्रेणीमध्ये “डेस’मधील रोलसाठी डेव्हिड टॅनेंटने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. नवाजुद्दीन आणि डेव्हिड यांच्या व्यतिरिक्त या कॅटेगरीमध्ये इस्रायलमधील रॉय निक आणि कोलंबियातील ख्रिस्तियाना तप्पन यांना देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.