मुंबई – सुमन एंटरटेनमेंट ने मराठी भाषेत अनेक दर्जेदार गाण्यांची निर्मिती केली असून त्यांच्या प्रत्येक गाण्याला संगीतरसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
प्रत्येक गाणे श्रवणीय असून त्यातील दृश्येही विलोभनीय आणि नजर खिळवून ठेवणारी असतात. अशा दर्जेदार गाण्यांची निर्मिती करणारे ‘सुमन एंटरटेनमेंट’ आता हिंदीत पदार्पण करत आहे.
मराठीप्रमाणेच हिंदीतही दर्जेदार गाण्यांची निर्मिती करण्याचा केदार जोशी यांचा मानस आहे. त्यांच्या पहिल्या हिंदी गाण्यात मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत दिसणार आहे. “सुमन एंटरटेनमेंट’ची या पुढील गाणी जरी हिंदी असली
तरी या गाण्यांसाठी प्राधान्य मराठी कलाकारांना देऊन, हे चेहरे जगभरात पोहोचवण्याचा या निर्मिती संस्थेचा प्रयत्न असून लवकरच पंजाबी आणि गुजराथी भाषांमध्ये देखील उत्तम गाणी प्रेक्षकांना पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत.