वाघोली – कुटुंबाचा खरा आधार असणाऱ्या महिलांना प्रोत्साहन व त्यांच्या कला गुणांसाठी उत्तम व्यासपीठाची गरज असल्याचे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले. वाघोली तालुका हवेली येथील राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी पवार बोलत होते.
आज पर्यंत राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी लहान-थोर तसेच महिलांसाठी राबवलेल्या सामाजिक बांधिलकीच्या विविध उपक्रमांबाबत आमदार अशोक पवार यांनी सातव परिवाराचे कौतुक केले. यावेळी वाघोली चे माजी उपसरपंच शांताराम कटके, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अर्चना कटके, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, लोचन शिवले, सुरेखा भोरडे, वाघोली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन काळे, सुनील जाधवराव, विजय हरगुडे, प्रदीप सातव, संदेश आव्हाळे, राजेश वारघडे, समीर भाडळे, मंगेश सातव, अतुल शिंदे, चिराग सातव पाटील, अनिल सातव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये मानाची पैठणी व नथ – माधुरी अहिरे, टीव्ही संच – पूजा गावडे, फ्रिज – वर्षा वाघमारे, शेगडी – सुरेखा मालपाणी, दत्त स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून लकी ड्रॉ द्वारे शशिकला शिंदे यांना डिनर सेट तर अश्विनी हरिहर यांना मोबाईल संच भेट देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी दत्तकृपा महिला बचत गट अध्यक्षा जयश्री राजेंद्र सातव पाटील, संचालिका पुजा अडसरे, चंद्रकला शिंदे, शशिकला शिंदे, नंदा सातव, छाया बहिरट, मीरा सातव, अनिता सातव, रोहिणी सातव, अनिता तोष्णीवाल , शितल तोष्णीवाल, वैशाली बहिरट, अपर्णा बहिरट, मेघा शिंदे, सुनीता शिंदे, रोहिणी सातव, स्वाती आल्हाट, वर्षा सातव, शीतल सातव, सुनिता तांबे, आदींनी परिश्रम घेतले.