वाघोली – शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात केंद्र व राज्याकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजप नेते गणेश कुटे यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य सचिव गणेश कुटे यांनी सांगितले की भाजप नेते विक्रांतदादा पाटील, प्रदीप दादा कंद, माजी आमदार बाबूराव पाचर्णे, धर्मेंद्र खांडरे, रोहिदास उंद्रे , हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष संदीप भोंडवे, यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय योजनांचा लाभ गरजू नागरिकांना होण्यासाठी गावोगावी मदत कक्षाची उभारणी करून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार आहे.
उपक्रमाची सुरुवात आव्हाळवाडी तालुका हवेली येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी पाच लाख रुपयाचा आरोग्य विमा कार्डचे वाटप करून झाली . यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते १०० नागरिकांना आरोग्य विमा कार्ड चे वाटप करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गणेश सातव पाटील, शरद आव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.