अबुधाबी – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील मैदानाचे क्युरेटर मोहन सिंह यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहे.
सध्यातरी मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. मोहन सिंह यांनी पंजाबमधील मोहाली स्टेडियमध्ये बराच काळ काम केल्यानंतर अबुधाबीतील मैदानाचे क्युरेटर म्हणून काम करत होते.
आयसीसीच्या स्पर्धेदरम्यान घडलेली ही दुसरी दु:खद घटना आहे. यापूर्वी 2007 साली पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यातील विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यादरम्यान पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वुल्मर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.