नवी दिल्ली – बॉलीवूडचे सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा लाडका मुलगा आर्यन खानची खूप काळजी वाटत आहे. ड्रग्ज प्रकरणानंतर शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाने अनेक नवे निर्णय घेतले आहेत, त्यापैकी एक त्याचा मुलगा आर्यन खानच्या सुरक्षेबाबत आहे. ड्रग्ज प्रकरणानंतर आर्यन खान आता स्वत:च्या इच्छेनुसार राहू शकणार नाही.
आर्यन मन्नतपासून दूर फार्महाऊसमध्ये राहणार –
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता अलिबागच्या फार्महाऊसमध्ये राहणार आहे. आपल्या मुलाने मानसिक आघातातून बाहेर यावे, अशी शाहरुख खानची इच्छा आहे. कोर्टाने जामिनासाठी ठेवलेल्या अटींमध्ये आर्यन खानचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. म्हणजेच जोपर्यंत आर्यन खान जामिनावर बाहेर आहे आणि त्याच्यावर हा खटला सुरू आहे तोपर्यंत त्याचा पासपोर्ट जप्त असेल. त्यामुळे शाहरूख त्याला विदेशात पाठवू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आर्यनला अलिबागमधील फार्महाऊसवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्यनसाठी वेगळा अंगरक्षक
शाहरुख खानने आर्यनसाठी बॉडीगार्ड ठेवल्याचे वृत्त आहे, जो त्याच्या हालचालींवर नेहमीच लक्ष ठेवेल. एका बॉलीवूड वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, ‘या संपूर्ण घटनेनंतर शाहरुख खान हादरला आहे. आर्यन खानचा स्वतःचा बॉडीगार्ड असता तर कदाचित ही गोष्ट एवढी वाढली नसती, असा विचार तो करत आहे.