मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून गायब असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सर्वांच्या समोर आले आहेत. आज अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची सांगण्यात येत आहे.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी आरोप केले होते. या प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावले होते. मात्र, अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांची ५ कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात विविध वॉरंट जारी करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्याने आज अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आहेत.
Mumbai | Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh arrives at the office of the Enforcement Directorate to join the investigation in extortion and money laundering allegations against him pic.twitter.com/qF1p1aGW11
— ANI (@ANI) November 1, 2021
गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या, मात्र तरीही देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती.
त्यांना अनेकदा समन्स बजावले होते, परंतू ते ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते. त्यांचे म्हणणे ते वकिलांच्या मार्फत न्यायालयात मांडत होते. गेल्या पाच महिन्यांपासून विविध तपास यंत्रणा अनिल देशमुखांचा शोध घेत होत्या परंतु त्यांचा कोणताच शोध लागत नव्हता. मात्र आज अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.