मुंबई – आयपीएलच्या माध्यमातून नव्या कंपन्यांनी भांडवल उभारणी सुरू केले असून त्याला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. नायका या कंपनीचा आयपीओ 28 ऑक्टोबर पासून गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार आहेत.
आयपीओमधील शेअरचा किंमत पट्टा 1,085 ते 1,125 रुपये इतका ठेवण्यात आलेला आहे. या माध्यमातून कंपनी 5,352 कोटी रुपये उभारण्यात प्रयत्न करणार आहे. एक नोव्हेंबर पर्यंत हा आयपीओ उपलब्ध असेल.
तर फिनो पेमेंट बॅंकेचा आयपीओ 29 ऑक्टोबरपासून गुंतवणूकदारांना उपलब्ध होणार आहे. या आयपीओमधील शेअरचा किंमत पट्टा 560 ते 577 रुपये इतका आहे. आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी 1200 कोटी रुपये उभा करण्याची शक्यता आहे. हे आयपीओ साधारणपणे 11 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारावर नोंदले जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.