Pune Crime: शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करुन बनावट चेकद्वारे बँकेची फसवणूक; पाच जणांना अटक

पुणे – शासकीय अधिकाऱ्यांच्या चेक व सही शिक्क्यांचा दुरुपयोग करून बँकेची फसवणूक करणाऱ्या पाच जणांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरोपींनी संगनमताने सातारा रस्तयावरील नामांकित बँकेची फसवणूक केली असून यवतमाळमधील एका बँकेतून २८ लाख रुपये काढल्याचे तपासात समोर आले आहे.

विश्वनाथ आनंद किरतावडे (४८, धनकवडी), सुदेश मधुकर आव्हाड (५८, कोंढवा), सागर प्रेमचंद पारख (३८, येरवडा), श्रवण मल्लय्या तागलापोल्ली (२८, चंद्रपूर) , विकास मुनलाल यादव (३०, गोंदिया) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत बँकेच्या शाखा प्रबांधकाने फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास सातारा रस्त्यावरील एका बँकेत अगरतळा महापालिका आयुक्तांच्या नावाचा बनावट चेक वटवन्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली होती. यानुसार सापळा रचून किरतावडे याला ताब्यात घेण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे साथीदार आव्हाड आणि पारख यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन साथीदारांबाबत माहिती दिली.

त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी डेक्कन येथून श्रवण आणि विकास यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी बनावट चेकद्वारे चंदिगढ येथील मुख्य लेखापाल यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील खात्यातून २८ लाख रुपये काढल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिसांनी तपास केला असता श्रवण आणि विकास यांच्यावार चंदिगढ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात त्यांना आणखी कुणी मदत केली आहे का? याबाबत सहकारनगर पोलिस तपास करत आहेत.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र डहाळे, उप-आयुक्त सागर पाटील , सहा.पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक(गुन्हे) युनुस मुलाणी, सहा.पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण, उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस अंमलदार बापु खुटवड, अरुण मोहीते, सुशांत फरांदे, महादेव नाळे, भुजंग इंगळे, मनोज निर्मळे, सागर शिंदे, प्रदिप बेडीस्कर,सागर सुतकर, निखील राजीवडे, महेश मंडलीक व भाऊसाहेब आहेर यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.