पुणे – बिबवेवाडी येथे एकतर्फी प्रेमातून खून केलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी हा खटला जलतगती (फास्टट्रॅक) न्यायालयामध्ये चालवावा, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली आहे. याबाबत निवेदन दोघांनाही देण्यात आलेले आहे.
तसेच, या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरणा आहे. कुटुंबियांनी आरोपीपासून जीविताला धोका आहे. त्यामुळे पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तब्बल 44 वार करून 12 ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीचा खून केला होता. यामुळे शहरात खळबळ माजली आहे. तरूणींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबियानाही मोठा धक्का बसला आहे. या परिस्थितीत कुटुंबियांनी भेट घेऊन ही मागणी केली आहे.
अॅड. हेमंत झंजाड यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्तीची मागणी फौजदारी प्रॅक्टीस करणारे प्रसिध्द वकील आणि पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड यांची या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी कुटुंबियांनी केली. याविषयी अॅड. झंजाड म्हणाले, त्या मुलीचे कुटुंबिय माझ्याकडे भेटीसाठी आले होते. त्यांनी या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली आहे.