ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त भाजपायुमोतर्फे प्रदर्शन
कोथरूड – भारतीय जनता युवा मोर्चा यांच्यातर्फे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आयोजित “सफर विमानांची, सफर हवाई दुनिये’ची या अनोख्या प्रदर्शनाचे उद्घाटन भूषण गोखले एअर मार्शल (नि) व महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्या हस्ते पार पडले.
या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. यावेळी (नि) एअर मार्शल भूषण गोखले विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्या अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. मुलींसाठीही या क्षेत्राचे दरवाजे उघडले असून मुलीनां या संधीचा फायदा घेत देशाची सेवा करावी, संगणक प्रणाली व ड्रोनच्या क्षेत्रात मुली चांगल्या काम करू शकतात.
बांग्लादेश फाळणी युद्धाच्यावेळी त्यांनी व त्यांच्या बंधुनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख भूषण गोखले यानी केला. यावेळी कोथरूड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत अनिल मोहोळ यांनी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पावलावर पाऊल ठेवीत आजच्या पिढीने भारताच्या संरक्षण क्षेत्रात कामगिरी करावी यासाठीच हे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे असे आवर्जून नमूद केले.