लंडन – स्टार फुटबॉलपटू रॉबर्ट लेवानोव्हस्की आणि सर्ज गनाब्री यांनी केलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर बायर्न म्युनिकने बुंदेसलिगा फुटबॉल स्पर्धेच्या साखळी सामन्यात बायर लेव्हरकुसेन संघाचा 5-1 असा पराभव केला.
बायर्नचा हा आठ सामन्यांतील सहावा विजय ठरला. बायर्नने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला लेवानोव्हस्कीने गोल करत बायर्नला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
त्यानेच 30 व्या मिनिटाला बायर्नची आघाडी आणखी वाढवली. त्यानंतर बायर्नने तीन मिनिटांत तीन गोल करत पहिला हाफ संपण्यापूर्वी 5-0 अशी मोठी आघाडी मिळवली.
थॉमस मुलरने 34 व्या व गनाब्रीने 35 व 37 व्या मिनिटाला गोल केले. दुसरा हाफ सुरू झाला. त्यानंतर लेव्हरकुसेनकडून एकमेव गोल पॅट्रिक शिकने 55 व्या मिनिटाला केला.