परभणी – राज्यातील कॉंग्रेसमधील नेत्यांची गळती चालू असल्याचे चित्र आहे. असे असताना काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचे बंधू विजयराव वरपूडकर हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कॉंग्रेसला धक्का बसला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विजयराव वरपूडकर आज दुपारी 2 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विजयराव वरपूडकर परभणीचे माजी जिल्हाध्यक्ष होते.
वरपूडकर भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. परभणीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर आल्या असल्याने काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो.