चिबळी – खेड तालुक्याच्या दक्षिण भागात चाकण परिसरात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या निघोजे वसाहतीमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील जनसंपर्क कार्यालय खेड तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे यांच्या वतीने सुरू करण्यात आले. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खेड तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे यांनी सर्वांचे स्वागत केले.
खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील गोरगरीबांना व तरुण वर्गाांना न्याय मिळवून देण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी विविध योजना संदर्भातील माहिती सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे व मोहिते-पाटील यांच्याशी संपर्क करणे सुलभ व्हावे या हेतूने जनसंपर्क कार्यालयाचे नियोजन केले असल्याचे आशिष येळवंडे यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच परिषद अध्यक्ष आशिष येळवंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास कातोरे, व कुरुळी मरकळ परिसरातील सरपंच उपसरपंच व सर्व पोलीस पाटील खेड तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.