राजगुरुनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील आखरवाडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरीचे मुख्याध्यापक संजय पाटील, विठ्ठलनगर शाळा मुख्याध्यापक भावना साळुंके, चास शाळेचे मुख्याध्यापक बजरंग सुपे यांचा सेवापूर्ती निमित्ताने या गुरुजनांचा मानपत्र, भेट वस्तू व पोशाख देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, कात्रज डेअरी संचालक अरुण चांभारे, माजी जिल्हा परिषद सदस्य मंगलताई चांभारे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कैलास लिंभोरे, कैलास सांडभोर, गटशिक्षण अधिकारी अमोल जंगले, विस्तार अधिकारी जीवन कोकणे, गजानन पुरी, केंद्रप्रमुख फक्कड लांघी, विक्रीकर निरीक्षक तुकाराम बोंदर, अॅड. सर्जेराव पानसरे,
तुकाराम लोखंडे, पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष शांताराम नेहरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश कांबळे, तालुका अध्यक्ष अभिजित नाईकरे, खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सभापती अशोक सावंत, दत्तात्रय शिनगारे, सुनील वाघ, तुषार वाटेकर, सुभाष मुळुक, प्रवीण कदम, विठ्ठल तांबे, सुरेश नाईकरे, प्रफुल्ल बुटे, प्रकाश घोलप, नवनाथ मुळुक, दयानंद शिंदेयांसह मोठ्या संख्येने शिक्षक वृंद उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते पाटील जिल्हाध्यक्ष शांताराम नेहरे, सुरेखा नाईकरे, संदीप जाधव, पौर्णिमा लोखंडे, तुकाराम बोंदर, प्रकाश घोलप, भावना साळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम संयोजन आखरवाडी केंद्रातील केंद्रप्रमुख फक्कड लांघी, संदीप जाधव, दत्तात्रय बोडरे, दत्तात्रय शिनगारे, विलास निसरड, केंद्रातील सर्व शिक्षक यांनी केले. प्रास्ताविक केंद्र प्रमुख फक्कड लांघी, सूत्रसंचालन मधुकर गिलबिले, शालन कळमकर, विशाल शिंदे यांनी केले. आभार बजरंग सुपे यांनी मानले.