मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानयाला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याला आज जामीन मिळण्याची शक्यता आहे. NCB ने शाहरुख खानला आर्यनसोबत फोनवर बोलण्याची परवानगी दिली होती. चौकशीदरम्यान आणि वडिलांशी फोनवर बोलतानाही आर्यन सातत्याने रडत असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या 4 वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याची कबुली आर्यनने दिल्याची माहिती आहे.
आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्यातही सर्च ऑपरेशनसाठीही टीम तयार आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याच्या लँडलाईन फोनवरुन शाहरुख खानशी सुमारे 2 मिनिटे बोलण्यास दिले. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान चौकशीदरम्यान सतत रडत होता. त्याने भारताबाहेर यूके ,दुबई आणि इतर देशांमध्ये ड्रग्सचे सेवन केले आहे.