नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनोज वाजपेयी यांच्या वडिलांचे राधाकांत वाजपेयी यांचे आज सकाळी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. 85 वर्षीय राधाकांत वाजपेयी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेले कित्येक महिने त्यांची प्रकृती खूपच खराब होती. अलीकडेच त्यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राधाकांत यांना तीन मुले आहेत, ज्यात सर्वात मोठा मुलगा अभिनेते मनोज वाजपेयी आहे. मनोज यांच्या वडिलांनी त्यांना पश्चिम चंपारणमधील एका छोट्याशा खेडे गावातून मुंबईला पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
राधाकांत वाजपेयी यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर बॉलिवूड आणि अभिनेत्याचे मूळ गाव असलेल्या गौनाहा खंडाच्या बेलव्यात शोककळा पसरली आहे.