मुंबई – अभिनेता मनोज वाजपेयी आपल्या दमदार अभिनयासाठी इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातो. गँग्ज ऑफ वासेपूर पासून ते फॅमिली मॅन सारख्या कलाकृतींमधून मनोजने आपल्या अभिनयाची एक वेगळी उंची गाठली निर्माण केली आहे. परंतु आजही मनोज वाजपेयी म्हंटल की राजनीतमधील करारा जवाब मिलेगा वाल पात्र आठवत. तसेच मनोजच्या फॅन्सने तर ‘भिकू म्हात्रे’ला आजही फेव्हरेट यादीत ठेवलं आहे.
राम गोपाल वर्माच्या सत्या या चित्रपटातील भिकू म्हात्रे हे पात्र आजही अनेकांच्या काळजात घर करून आहे. नुकतीच मनोज वाजपेयीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे आता भिकू म्हात्रे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मनोजने इंस्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो हातात गोल्डन गण आणि गोल्डन घड्याळ घालून दिसतो. त्यासोबतच त्याने ‘भिकू म्हात्रे इस बॅक’ असं कॅप्शन देऊन मोठा सस्पेन्स निर्माण केला आहे.
View this post on Instagram
यासोबतच मनोजने ‘हिट्स म्युजिक’ या कंपनीला देखील टॅग केलं आहे. चाहत्यांनी यावर जोरदार कमेंट करत सत्या २ येणार का ? असा सवाल विचारला आहे. मनोज वाजपेयीने नेमका हा व्हिडीओ का टाकला याचे कारण अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.