मुंबई – आयडियल स्पोर्टस अकादमी आयोजित अखिल भारतीय स्तरावरील 15 वर्षांखालील मुला-मुलींच्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत आंध्र प्रदेशचा महेंद्र मेकला याने विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत 7.5 गुण प्राप्त करत महेंद्रने संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व राखले.
पुण्याच्या दक्षराज बोले यास 6.5 गुणांनी मागे टाकत चेन्नईच्या अज्जेशने उपविजेतेपद पटकावले. त्यामुळे दक्षराजला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
इन्स्टिट्यूट फॉर चेस एक्सलन्स व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या सहकार्याने ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कल्याणच्या अरविंद अय्यरने (6 गुण) चौथा क्रमांक, नागपूरच्या दिशांक बजाजने (6 गुण) पाचवा क्रमांक, चेन्नईच्या डी. पी. अभिनवने (6 गुण) सहावा क्रमांक, नरसिंगपूरच्या वैभव नेमाने (6 गुण) सातवा क्रमांक, भुवनेश्वरच्या ओम खडंगने (5.5 गुण) आठव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला.
स्विस लीग पद्धतीने साखळी नऊ फेऱ्यांत ऑनलाइन लीचेस प्लॅटफॉर्मवर ही स्पर्धा पार पडली.