कन्हैया कुमारने काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी CPI च्या कार्यालयातील AC काढून नेला

नवी दिल्ली – जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. त्यांच्यासोबत सीपीआयचे काही युवा नेते देखील काँग्रेसमध्ये सामील होणार आहेत.

दरम्यान, काँग्रेसमध्ये जाण्यापूर्वी कन्हैया कुमार यांनी पाटण्यातील सीपीआयच्या कार्यालयामधील खोलीत असलेला एसी उतरवून नेला आहे. हा एसी कन्हैया कुमार आणि त्याचे सहकारी राहत असलेल्या खोलीत लावलेला होता.

कन्हैया कुमारने सीपीआयकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना भाजपच्या गिरीराज सिंह यांच्याविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. कन्हैया कुमार यांच्यासह गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवानी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे.

दरम्यान कार्यालयातील एसी काढून नेल्याचं सीपीआयच्या कुठल्याही नेत्याला माहित नव्हत. सीपीआयचे ऑफिस इन्चार्ज इंदुभूषण वर्मा यांनी सांगितले की, त्या खोलीमध्ये त्यांचा माणूस राहत होता. दोन महिन्यांपूर्वी तो एसी काढून घेऊन गेला. तर सीपीआयचे नेते विजय मिश्रा यांनी सांगितले की, कन्हैया कुमार याने एसी घेऊन जाण्यासाठी पार्टीकडे परवानगी मागितली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.