नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस ही भारतातील दहशतवादाची जननी आहे आणि ते भगवान राम यांच्यावरील लोकांच्या विश्वासाचा अपमान करतात, अशी खरमरीत टीका केली.
“…BJP’s Chacha Jaan, Asaduddin Owaisi has entered Uttar Pradesh. If he (Owaisi) will abuse them (BJP), they will not file any case against him. They are a team..”: BKU leader Rakesh Tikait in Baghpat (14.09) pic.twitter.com/qaisUNKr8R
— ANI (@ANI) September 15, 2021
“२०१७ पूर्वी प्रत्येकाला रेशन मिळत होतं का? पूर्वी जे ‘अब्बा जान’ म्हणत असत त्यांनी गरिबांचे रेशन पचवले,” अशी टीकाही त्यांनी केली. त्यांचा या टीकेमुळे राजकारण चांगलेच तापलेले दिसून आले.
त्यांचा या टीकेनंतर अब्बा जान’ या शब्दावरून राजकारणाला सुरूवात झाल्यानंतर आता ‘चाचा जान’ या शब्दाचाही वापर जाहीर भाषणात करण्यात आलाय. शेतकरी नेते आणि भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी ‘चाचा जान’ या शब्दाचा वापर करत एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला.
राकेश टिकैत म्हणाले,’भाजपचे चाचा जान असदुद्दीन ओवैसी उत्तर प्रदेशात गेलेत. ओवैसींनी भाजपला शिव्या दिल्या तरी त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल होणार नाही. कारण भाजप आणि ओवैसी ही एकच टीम आहे’ असं वक्तव्य यावेळी राकेश टिकैत यांनी केलंय.