पुणे( प्रतिनिधी) –पुण्यातील बावधन परिसरातील बिग बास्केटच्या गाेदामास रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याचे सुमारास अचानक भीषण आग लागून काेटयावधी रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. अग्नीशामक दलाच्या एकूण १२ फायरगाडयांनी सदर आगग पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रणात आगणत आगगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत गाेदामातीलआगीत गाेदामातील दाेन लाख रुपयांचे नाेटा जळून खाक झाले असून सहा लाख रुपये वाचविण्यात अग्नीशामक दलास यश मिळाले आहे.
सदर आगीत बिग बास्केट गाेदमातील धान्याचा साठा, भाजीपाला, किराणा सामन जळून खाक झाले असून गाेदामा जवळील २१ इलेक्ट्रीक दुचाकी आगीत भस्मसात झाले. तर पाच दुकाची, सात ते आठ टेम्पाे, एक तीनचाकी टेम्पाे यांना आगीची झळ बसून त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बावधन परिसरात संबंधित बिग बास्केट कंपनीचे २५ हजार स्केवअर फुटाचे पत्र्याचे गाेदाम आहे.
हे गाेदामात रविवारी रात्री १५ ते १६ कर्मचारी काम करत असताना अचानक गाेदामात अाग लागल्याची घटना साडेअकरा वाजण्याचे सुमारास घडली. याबाबत अग्नीशामक दलास माहिती मिळाल्यानंतर तातडीने पुणे महापालिका अग्नीशामक दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए, एमआयडीसी येथील १२ अग्नीशामक दलाच्या फायरगाडया व पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी पाण्याचा फवारा मारत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
परंतु आगीने राैद्ररुप धारण केले असल्याने आग विझविण्यास तब्बल तीन तासांचा कालावधी लागला आणि साेमवारी पहाटे पावणेपाच वाजेपर्यंत कुलिंगचे काम करण्यात आले. आगीची घटना घडल्यानंतर गाेदामाचे व्यवस्थापक ही घटनास्थळी आले व त्यांनी गाेदामातील तिजाेरीत माेठया प्रमाणात राेकड असल्याचे सांगितले.