पुणे- सामूहिक बलात्कार घटनेतील दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना केवळ निलंबित करू नका. तर, त्यांना तत्काळ बडतर्फ करा. तसेच येथील सीसीटीव्हीची देखरेख करण्याची जबाबदारी असलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.
पुणे शहरात अशा घटना घडू नयेत, यासाठी रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीस, स्थानिक कर्मचारी आणि नागरिक यांच्यासमवेत संयुक्त कार्यक्रम राबवून प्रतिबंधक योजना राबवाव्यात, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस प्रशासनास दिली.
दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ चार्जशीट दाखल करावे. तसेच पीडित मुलीला मनोधैर्य योजनेतून मदत देण्याबाबत पोलीस आयुक्तांना सूचना केल्या आहेत. रेल्वे आणि बस स्थानक याठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कार्यक्रम राबवावेत, असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिल्याचे त्यांनी सांगितले. तर, दक्षता समितीच्या बैठका घेण्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी सूचना दिल्या.
करुणा शर्मा यांचे प्रकरण वैयक्ति
“करुणा शर्मा जे काही बोलतात, त्यावर त्यांचा राजकीय अभ्यास अधिक आहे. तो विषय त्यांचा वैयक्तिक आहे. त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य नाही,’ असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.