छोट्या पडद्यावरील “आई कुठे काय करते’ या मालिकेतील संजना अर्थातच अभिनेत्री रूपाली भोसले आपल्या मराठमोळा लुकमुळे खूपच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. रूपालीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेयर केले आहेत. यामध्ये तिने नऊवारी साडीतील लूक कॅरी केला आहे.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये रूपालीने नऊवारी साडी परिधान केली आहे. त्यालाच साजेशी अशी सुंदर केशरचनासुद्धा केली आहे. तसेच पारंपरिक दागिनेसुद्धा चढवले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
मालिकेत सतत वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणारी संजना म्हणजेच रूपाली या पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. रूपालीला मराठी बिग बॉसमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर आत्ता ती “आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धीस आली आहे.
View this post on Instagram
रूपालीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच पसंत पडत आहेत. चाहते लाईक्स आणि कमेंट्स करून तिच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.
View this post on Instagram