गाझीयाबाद – येथे झालेल्या तुफानी पावसामुळे वीज वहन करणारी एक वायर तुटूून ती दुकानाच्या पत्राच्या शेडवर पडली आणि त्यातून झालेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून तीन लहान मुलांसह एकूण पाच जण यात मरण पावल्याची घटना आज येथे घडली.
सिहानी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राकेश मार्गावर ही घटना घडली. तेथील एका किराणा दुकानदाराने आपल्या दुकानासमोर एक पत्र्याची शेड टाकली आहे. त्याच्या डोक्यावरून वीजेची जी लाईन जात होती ती पावसामुळे तुटली आणि त्यातील वीज प्रवाह या शेड मध्ये उतरला.
त्याच्या खांबातूनही हा प्रवाह वाहत होता. या दुकानात खरेदी साठी आलेल्या तीन लहान मुलांनी या खांबाला हात लावल्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यांना वाचवायला गेलेल्या अन्य दोन जणांनाही या वीजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.