दुर्दैवी! फटाक्याच्या दुकानात स्फोट; पाच जणांचा जागीच मृत्यू तर २५ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील शंकरपुरम शहरात  फटाक्याच्या दुकानात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, २५ जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. फटाक्यांच्या अचानक झालेल्या स्फोटामुळे शहरात एकच खळबळ उडाली.

शंकरपुरम आणि कल्लाकुरिची येथील अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. “दिवाळीपूर्वी शंकरपुरम येथे लावण्यात आलेल्या फटाक्यांच्या दुकानात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण दुकानाचे मालक आणि कामगार असल्याची शक्यता आहे.

तसेच इतर २५ जण जखमी झाले आहेत. स्फोटात जखमी झालेल्या लोकांना कल्लाकुरिची येथीलसरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे,”असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.