नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिक इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीकडे वळत आहेत. मात्र इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती अधिक आहेत. त्यामुळे सरकार यावर सबसिडी देत आहे. तरी देखील या स्कूटरची किंमत मध्यमवर्गीयांच्या अवाक्याच्या बाहेर आहे. मात्र आता ५० हजारांच्या आत किंमत असलेल्या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे.
दिल्ली आयआयटीचं स्टार्टअप असलेल्या जेलियएस मोबॅलिटीने या वर्षाच्या सुरुवातीलाच एका बाईकच्या निर्मिती केली होती. ‘होप’ नावाने तयार करण्यात आलेल्या स्कूटरमुळे युजर्सला प्रतिकिलोमीटर केवळ २० पैसे खर्च येईल. डिलीव्हरी पर्सन आणि शहरी भागात फिरणाऱ्यांसाठी ही स्कूटर अत्यंत फायदेशीर ठरू शकते.
होप स्कूटरवर विशेष सूट असून या स्कूटरसाठी नोंदणी किंवा ड्राईव्हींग लायसन्सची गरज भासणार नाही. या स्कूटरमध्ये लिथियम बॅटरी आणि इलेक्ट्रीक चार्जर देण्यात आलं आहे.
दरम्यान होप स्कूटर केवळ चार तासांत पूर्ण चार्ज होते. यासाठी घरी जे सॉकेट वापरण्यात येतं त्यावरही ही स्कूटर चार्च करता येते. दोन प्रकारच्या बॅटरीमध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे. ज्याची रेंज अनुक्रमे ५० किमी आणि ७५ किमी आहे. या स्कूटरमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, डेटा मॉनिटरींग सिस्टम आणि पेडल असिस्टंट देण्यात आलं आहे. जेणेकरून आपण पेडलने सुद्धा स्कूटर चालवू शकतो. या स्कूटरची किंमत 46,999 रुपयांपासून सुरू होते.