टीव्हीएसने प्रिमियम इलेक्ट्रिक क्रॉसओवर दुचाकी स्कूटर ‘TVS X’ लॉन्च केली आहे, जी खास तरुणाईसाठी बनवण्यात आल्याचे सांगितले जाते. कंपनीने याची सुरुवातीची किंमत 2.50 लाख रुपये ठेवली आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये 140 किलोमीटर अंतर कापेल. ही स्कूटर २.६ सेकंदात ०-४० किमी प्रतितास वेग पकडेल. या स्कूटरचा टॉप स्पीड 105 किमी असेल.
2,49,990 रुपये ही या नव्या बाईकची सुरुवातीची किंमत असेल, TVS मोटरचे सीईओ केएन राधाकृष्णन यांनी सांगितले. एक पोर्टेबल 950W चार्जर Rs 16,275 आणि 3KW स्मार्ट X होम रॅपिड चार्जर देखील पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले, “आम्ही तरुणाईला लक्ष्य करत आहोत.तसेच येणारे हे टेक्नॉलॉजीचे युग असणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
या स्कूटरमध्ये काय खास आहे?
कमाल पॉवर 11 kW (15 PS), रेटेड पॉवर 7 kW (9.5 PS), टॉर्क 40 Nm
10.2 इंच TFT टचस्क्रीन
तीन राइडिंग मोड “Xtealth”, “Xtride” आणि “Xonic”
मल्टी लेवल री-जनरल मोड
एबीएस (फक्त पुढचे चाक)
क्रूज कंट्रोल
रिवर्स एसिसटेंट
TVS SmartXonnect कनेक्टेटेड
लाइव वीडियो स्ट्रीमिंग, ऑन बोर्ड गेम्स, वेब ब्राउज़र
लाइव लोकेशन शेयरिंग, कॉल और मैसेज
रायडर संरक्षण आणि सहाय्यासाठी TVS स्मार्ट Xshield