मुंबई– भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरु करावा, अशी खोचक टिका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे आरोप केले होते. त्यावर आता राष्ट्रवादीकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
आयकर विभागानं छगन भुजबळ यांची 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केला आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी ट्विट करत केला होता. अल जेब्रिया कोर्टा संदर्भात किरीट सोमय्यांनी ट्विट करत भुजबळांवर हे आरोप केले आहेत. मात्र आता या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारात भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
किरीट सोमय्या यांचे ट्विट-
“ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांचा ₹100 कोटींचा बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या”
Thackeray Sarkar’s Minister Chhagan Bhujbal, Ex MP Samir Bhujbal Ex MLA Pankaj Bhujbal’s ₹100 crore BENAMI Properties Siezed by Income Tax
ठाकरे सरकारचे मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांचा ₹100 कोटींचा बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 25, 2021
दरम्यान, भाजपाकडून कायम बिनबुडाचे आरोप होत असतात. ते महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना बदनाम करत आहेत. राजकारण करा मात्र वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. समजून घेऊन जर आरोप केले तर उचित होईल. बदनामीचं कारस्थान ताबडतोब थांबवावं, असा खोचक सल्ला देखील तापसे यांनी दिला आहे.