नाशिक – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावण्याचे वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नारायण राणे यांच्यावर नाशिक, पुणे व महाड येथे गु्न्हा दाखल करण्यात आला असून नाशिक येथून राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना कऱण्यात आले आहे.
राणे यांच्यावर झालेल्या गुन्ह्यांचे गांभीर्य पाहून यासंदर्भात पुनरावृत्ती टाळण्यासाठी राणेंना अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रीपदाचा आदर राखून तसंच हक्कभंग होणार नाही याची दक्षता घेऊन कारवाई करण्यात येईल असेही आयुक्त दीपक पांडेय यांनी सांगितले आहे.