नारायणगाव – येणाऱ्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुका संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची घोषणा करण्यात आली.
जुन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित आणि विधी विभागाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली, त्यात ही घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस ऍड. किशोर शिंदे, ऍड. समीर इनामदार, ऍड. जमीर इनामदार, नरेंद्र तांबोळी,
पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, उपाध्यक्ष मकरंद पाटे, तालुका अध्यक्ष साईनाथ ढमढेरे, उपाध्यक्ष दिलीप खिलारी, योगेश तोडकर यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
जिल्हा जनहित कार्यकारिणी :उपाध्यक्ष : नवनाथ वाळुंज, सचिव अवधूत अष्टेकर, तालुका अध्यक्ष महेश खरात, उपाध्यक्ष अय्याज जमादार, सोशल मीडिया उपाध्यक्ष अशोक बोडके, तालुका उपाध्यक्ष संपत खरडे,
विभाग संघटक अक्षय मंडलिक, नारायणगाव विभाग अध्यक्ष अनिल देशपांडे, वारूळवाडी शहराध्यक्ष सिद्धेश तळपे, नारायणगाव शहराध्यक्ष हेमंत कांबळे.
जुन्नर तालुका विधी विभाग :अध्यक्ष ऍड. नंदकुमार चौधरी, उपाध्यक्ष नरेश सदाकाळ. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस ऍड. किशोर शिंदे यांच्या हस्ते वैदवस्ती नारायणगाव येथे मनसे शाखेचे उद्घाटन करण्यात आले.