पुणे – शहरात शनिवारीही कोवॅक्सिनचे सात केंद्रावर डोस मिळणार असून, त्यातील सहा केंद्रांवर एक हजार आणि एका केंद्रावर पाचशे डोसचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारीही कोविशिल्डचे डोस नसल्याचे महापालिकेने कळवले आहे.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना शनिवारी कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 20 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 20 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
याशिवाय 10 जुलैला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना शनिवारी 40 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 20 टक्के
- कोवॅक्सिनचे डोस मिळण्याची केंद्रे
- येरवडा- राजीव गांधी रुग्णालय
- कोथरूड- कै. जयाबाई सुतार दवाखाना
- कर्वेनगर- कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना
- गाडीखाना- कै. मालती काची दवाखाना
- महंमदवाडी- कै. दशरथ भानगिरे दवाखाना
- मंगळवारपेठ – कमला नेहरू रुग्णालय
- ससून सर्वोपचार रुग्णालय