जळोची : पुण्यातील फुकट बिर्याणीचे प्रकरण ताजे असतानाच बारामती तालुका पोलीस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याला एक लाख दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दादासाहेब ठोंबरे (वय -50) असे पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार यांचे मारहाण प्रकरणातून नाव कमी करण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि मदत करण्या साठी म्हणून पोलीस कर्मचारी दादासाहेब ठोंबरे यांनी १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र तडजोडीअंती १ लाख १० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.