मुंबई – मुंबई शहरातील कुर्ला भागात एका 19 वर्षीय युवकाने बेल्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गर्लफ्रेंडसोबत व्हिडिओ चॅट करत असताना तिने लग्नास नकार दिल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
कुर्ला येथील भारतीय नगर परिसरातील हा युवक आहे. हा युवक फोन घेत नसल्याकारणाने त्याच्या आईने शेजाऱ्यांना फोन करुन विचारणा केली असता शेजाऱ्यांनी युवक राहत असलेल्या ठिकाणी गेले. त्यावेळी हा युवक फांशी घेतलेल्या अवस्थेत मिळाला. अशी माहिती वीबी नगर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात कळाले की, या युवकाने आत्महत्येपुर्वी एका मुली सोबत व्हिडिओ कॉल केला होता. ती मुलगा त्याच्याच कॉलेजमधली होती. फाशी घेण्याच्या आधी युवकाने या मुलीस व्हिडिओ कॉल केला व लग्नास नकार दिल्यास जीव देणार असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तरुणीने लग्नास नकार दिल्यावर तरुणाने फाशी घेत आपले जीवन संपविले.