नवी दिल्ली : भारतीय संघाने तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा विक्रम करत खरंच ‘चक दे इंडिया’ म्हटले आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० ने नमवून उपांत्यफेरीत प्रवेश केला. भारतीय महिलांनी केलेल्या या कामगिरीनंतर सोशल नेटवर्किंगवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही मीम शेअर करत भारतीय महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
#India🇮🇳 writes history.. Women’s hockey 🏑 team enters Olympics semi-final for the 1st time #Cheer4India #Tokyo2020 pic.twitter.com/epJuWl8pdW
— PIB India (@PIB_India) August 2, 2021
सरकारच्या पत्रसूचना विभागानेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलने म्हणजेच पीआयबी इंडियाने एक मीम शेअर केले आहे. हे मीम पार्टनर या हिंदी चित्रपटामधील आहे. या मीममध्ये अभिनेता गोविंदा आणि सलमान खान दिसत आहेत. पार्टनर चित्रपटामध्ये मुलीला पटवून देण्यास मदत करणाऱ्या लव्ह गुरु सलमान खानच्या सल्ल्यानुसार काम झाल्यानंतर गोविंदाच्या कॅरेक्टरला भारवावून गेल्यानंतर सर्दीचा त्रास होतो असं दाखवण्यात आलंय. अती आनंदात गोविंदा अनेकदा नाक पुसत “इतनी खुशी… इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई”, असे म्हणण्याची सवय असते. हेच मीम नेटकरी अनेकदा सोशल नेटवर्किंगवर काही चांगले घडल्यानंतर शेअर करत असतात. हेच मीम चक्क भारत सरकारने शेअर केले आहे.
After seeing government platform also seems humorous , achha hai 🤣🤣🤣 pic.twitter.com/lQdBNJCLfr
— Bharatsinh 🇮🇳 (@Bharatmay83) August 2, 2021
अनेक नेटकरी त्यावर मजेदारपद्धतीने प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करुन दाखवत मोठ्या थाटात उपांत्यफेरीत प्रवेश केला. भारतीय संघाच्या विजयानंतर सोशल नेटवर्किंगवर मीमचा पाऊस पडताना दिसत आहे.