सदर शहर (इराक) – इराकच्या सदर शहरात झालेल्या आत्मघाती बॉम्ब स्फोटात 35 लोक ठार झाले आहे. दरम्यान, या बॉम्ब स्फोटात 60 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहे. ही घटना सोमवारी सांयकाळी इराकमधील सदर शहरात घडली आहे.
या हल्ल्याची जबाबदारी आयएस (IS) या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. दहशतवाद्यांनी स्वत:ला बॉम्बव्दारे उडवून घेतले आहे. आयएसचे म्हणणे आहे की, उद्या मंगळवारी ईद असल्याने सदर शहरातील बाजारात मोठी गर्दी होती. त्यामुळे दहशतवाद्यांनी हे ठिकाणी निवडल्याचे टेलिग्रामव्दारे सांगितले.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात बरेच लोक गंभीर जखमी झाले असून यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण जखमीपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. जखमी लोकांना उपचारसाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
या हल्ल्यानंतर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधेमी यांनी सुरक्षा कमांडर्सची आपत्कालीन बैठक बोलावली. तर दुसरीकडे इराकचे राष्ट्रपती बरहाम सालेह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, एका भयंकर गुन्ह्यासह काही लोकांनी ईदच्या आधी सदर शहरातील नागरिकांना लक्ष्य करायचे होते. जोपर्यंत या दहशतवादाचे उच्चाटन होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.