भारतातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या “आरआरआर’ने अखेर चाहत्यांसाठी एक मेगा ट्रीट म्हणून आपला मेकिंग व्हिडिओ लॉन्च केला आहे. या भव्य चित्रपटाची एक झलक प्रेक्षकांना या व्हिडिओतून पाहावयास मिळाली आहे.
दिग्दर्शक एसएस राजामौली, पेन मुव्हिज आणि त्यांच्या “आरआरआर’ टीमने हा मेकिंग व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मेकिंग व्हिडिओत राजामौली यांच्या “आरआरआर’च्या सेटवरील एक भव्य प्रसंग दिसून येतोय, ज्यात स्वतंत्रता पूर्व काळातील तो क्षण असल्याचे दिसते.
या चित्रपटासाठी एकत्रित आलेले वेगवेगळया इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकारांची एक झलक दाखविण्यात आली आहे. या मेकिंग व्हिडिओतून हे सिद्ध होते की, वास्तवमध्ये “आरआरआर’ हा भारतातील सर्वाधिक भव्यदिव्य आणि मोठा चित्रपट असणार आहे.
दरम्यान, हा चित्रपट स्वातंत्रता सैनिक कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामराजू यांच्या जीवनावर आधारित एक काल्पनिक कथा आहे. या बिग बजेट चित्रपटात मल्टी-स्टार राम चरण, एटीआर ज्यूनियर यांच्यासह अजय देवगन आणि आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारत आहेत.