पिंपरी -प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी त्यांच्या ताथवडे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी त्यांच्या व्यावसायिक भागीदारासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुरुवातीला बिझनेस पार्टनरला अटकदेखील केली. साप्ते यांना धमकाविणाऱ्या राकेश मौर्यला पोलिसांनी अटक केली आहे.
राकेश सत्यनारायण मौर्य (वय 47, रा. कांदिवली ईस्ट, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी चंदन रामकृष्ण ठाकरे (वय 36, रा. एकतानगर, कांदिवली वेस्ट, मुंबई) याला अटक केली आहे.
या दोघांसह नरेश विश्वकर्मा (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), अशोक दुबे (सर्व रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोनाली राजेश साप्ते (वय 45, रा. ताथवडे. सध्या रा. कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार तीन वर्षांपासून दोन जुलै 2021 या कालावधीत राजेश साप्ते यांच्या कांदिवली वेस्ट, मुंबई आणि ताथवडे, पुणे येथील घरी घडला.