लंडन ( Euro Cup 2020 ) – आज पहाटेच अर्जेंटिना फुटबॉल क्लबने कोपा अमेरिका स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. यात त्यांनी विजेत्या ब्राझीलचा 1-0 असा पराभव केला. दरम्यान कोपा अमेरिकेस्पर्धे सोबतच यूरो कप स्पर्धा चांगलीच चर्चेत राहिली. यूरो कप 2020 स्पर्धा गेल्या वर्षी करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर या स्पर्धेचं यावर्षी यशस्वी आयोजन करण्यात आलं. मात्र तत्पूर्वी या स्पर्धेत अनेक घडामोडी घडल्या.
या घडामोडींमुळे यूरो कप स्पर्धा चांगलीच चर्चेत राहिली. यूरो कप स्पर्धेच्या सुरुवातीला काही खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे ही स्पर्धा पुढे कशी पार पडेल? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता. मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. महिनाभर चालणाऱ्या स्पर्धेत एकूण 24 संघ सहभागी झाले होते आणि आज या स्पर्धेतील 51 वा सामना खेळविण्यात येणार आहे. इंग्लंड विरुद्ध इटली असा अंतिम सामना रंगणार आहे.
यूरो कप स्पर्धेतील घडामोडी
- स्पर्धा सुरु होण्यापूर्वी स्पेन संघातील सरजिओ बसक्वेट आणि डिआगो लोरन्टे या दोन खेळाडूंना करोनाची लागण
- डेन्मार्क विरुद्ध फिनलँड यांच्यात सामना सुरु असताना डेन्मार्कचा
फुटबॉलपटू ख्रिश्चियन एरिक्सन मैदानात कोसळल्यानंतर सामना काही काळ स्थगित - ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम, साखळी फेरीत 5 गोल झळकावले.
आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणाऱ्या इराणचा माजी स्ट्रायकर अली डेई याच्याशी बरोबरी
रोनाल्डोच्या कृतीमुळे कोका कोलाला फटका
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू रोनाल्डो एका पत्रकार परिषदेसाठी आला होता. यावेळी आपल्यासमोर कोका कोलाच्या दोन बाटल्या ठेवल्याचं त्याने पाहिलं. त्याने त्या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बाटली हातात घेऊन ‘पाणी’ असं म्हणत एकाप्रकारे पाणी पिण्यासाठी लोकांना प्रोत्साहित के एक कृती कोका कोला कंपनीला तब्बल चार बिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला होता.
“Water!”: Portuguese soccer superstar Cristiano Ronaldo removed two bottles of Coca-Cola, which sponsors the Euro tournament, away from him as he entered a news conference on Monday before holding up a bottle of water to the media. pic.twitter.com/mfh8GDhseF
— CBS News (@CBSNews) June 15, 2021
लोकेटेलीनेही बाटल्या हटवल्या
इटलीच्या लोकेटेलीने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल केले. त्याला या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आला. यासाठी सामन्यानंतर एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या पत्रकार परिषदेत लोकेटेली समोर दोन कोका कोलाच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या.
Locatelli following Ronaldo’s footsteps. Coca Cola gonna be a meme at this point 😂😂 pic.twitter.com/gK5wCKGM1v
— Abduł (@Abdul999_) June 16, 2021
फुटबॉलपटूची पुनरावृत्ती
रोनाल्डोनंतर फ्रान्सचा मिडफिल्डर पॉल पोगबाने एका पत्रकार परिषदेदरम्यान टेबलावर ठेवलेली Heineken बियरची बाटली काढली आणि खाली ठेवली. यूरो कप 2020 स्पर्धेसाठी कोका कोला आणि Heineken अधिकृत प्रायोजक आहेत.
Locatelli following Ronaldo’s footsteps. Coca Cola gonna be a meme at this point 😂😂 pic.twitter.com/gK5wCKGM1v
— Abduł (@Abdul999_) June 16, 2021
खेळाडू घुसला जाळ्यात!
चेक रिपब्लिकच्या चिकने स्कॉटलँडविरुद्ध ५२व्या मिनिटाला नोंदवलेला गोल जबरदस्त ठरला. मैदानाच्या अर्ध्या म्हणजे 49.7 मीटर यार्डातून त्याने हा गोल केला. चिकने मारलेला फटका स्कॉटलंड संघाचा गोलरक्षक डी मार्शलने अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
𝗪𝗛𝗔𝗧 𝗔 𝗚𝗢𝗔𝗟!
Patrik Schick with an effort that will go down in EURO history 🔥#EURO2020 pic.twitter.com/BqINLIPSMH
— UEFA EURO 2020 (@EURO2020) June 14, 2021
पॉलसेनचा जलद गोल
डेन्मार्कच्या युसूफ पॉलसेननं बेल्जियम विरुद्धच्या सामन्यात यूरो चषक 2020 स्पर्धेतला सर्वात जलद गोल झळकावला. हा गोल सामना सुरु झाल्यानंतर 1 मिनिटं आणि 39 सेकंद झाली असताना झळकावला. या गोलनंतर जलद गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत डेन्मार्कच्या युसूफ पॉलसेनला स्थान मिळालं.
लेझर लाईट मारल्याने संताप
उपांत्य फेरीत डेन्मार्क विरुद्धच्या सामन्यात हॅरी केननं निर्णायक गोल झळकावत इंग्लंडला विजय मिळवून दिला. 104 व्या मिनिटाला हॅरीनं हा गोल झळकावला. मात्र हा गोल झळकावण्यापूर्वी डेन्मार्कच्या गोलकिपरवर लेझर लाईट मारल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला.