भोपाळ – मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी कृष्णाबाई, प्रियकर शुभम अशी आरोपीची नावे असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णाबाईने आपल्या पतीचा हात धरला आणि प्रियकराने कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विदिशाचे पोलिस अधीक्षक विनायक वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदिशाच्या लटेरी तहसीलच्या मलिया खेडी गावात मंगळवारी रात्री पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची माहिती उघडकीस आली आहे. मात्र, या घटनेवेळी पत्नी कृष्णाबाई हिने बेशुद्ध झाल्याचे सांगितले. परंतु पोलिसांचा पहिल्या दिवसापासून तिच्यावर संशय होता. आता पोलिसांनी याचा खुलासा केला आहे.
कृष्णाबाई आणि शुभमचे 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी मिळून खून करण्याचा प्लॅन केला होता. कृष्णाबाई हिने आपल्या प्रियकराला फोन करून बोलावून घेतले होते. त्यानंतर शुभम कुऱ्हाड सोबत घेऊन तिच्या पतीला ठार मारण्यासाठी गावात आला होता. लग्नाच्या 15 दिवसानंतर कृष्णाबाई या महिलेने प्रियकरासोबत मिळून तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.