लुधियाना – लुधियानामधील सलेम टाबरी पार्कमध्ये माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा पुतळा जाळल्याची घटना घडली आहे. पुतळ्यावर पेट्रोल टाकून तो जाळण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडियो सोशलवर व्हायरल होताच पोलिसांनी तपास सुरु करून दोन जणांचा अटक केली आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले आहे की,’सोशलवर व्हायरल व्हिडियोमध्ये बोहरा गावचा रहिवासी मुख्य आरोपी रमनदीप सिंह मंगू मठ आणि पीरुबंदा येथे राहणारा त्याचा साथीदार सतपाल नवी यांनी राजीव गांधींच्या पुतळ्यावर पेट्रोल टाकून नंतर त्याला आग लावली.
या व्हिडियोमध्ये आरोपीनी त्यांच्या पुतळ्यावर पेट्रोल टाकतांना राजीव गांधी यांच्या विद्यमान पुतळ्यांना आम्ही सहन करू शकत नाही, अशा घोषणा दिल्या आहे.’ या घोषणा कॉंग्रेसचे स्थानिक नेते गुरसिमरन सिंग मंडला उत्तर देण्यासाठी देण्यात आल्या असे आरोपींनी पोलिसांना सांगितले आहे.
दरम्यान, रमनदीप आणि त्याचा साथीदार सतपाल या दोघांविरोधात सलेम टाबरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय आचारसंहिता कलम 435 (हानी पोहोचविण्याच्या उद्देशाने आग लावणे), आयपीसी कलम 153 ए (शत्रुत्व) आणि आयटी कायदा, मालमत्ता कायद्याच्या कलमांतर्गत नोंदविण्यात आले आहे.