लंडन – ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रिटनमधील उर्वरित निर्बंध शिथील करण्याचे सूतोवाच केले आहे. ब्रिटनमधील उर्वरित कायदेशीर निर्बंध 19 जुलै रोजी उठवले जातील, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे.
मात्र जर निर्बंध हटवले तर करोना रुग्णांची संख्या वाढू शकते, असे उपलब्ध आकडेवारीतून लक्षात येते आहे. पण लसीकरण वाढवल्याने रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या आणि करोना मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. असे सरकारचे म्हणणे आहे.
ज्याप्रमाणे फ्लूबरोबर राहणे लोकांना शक्य होते आहे, त्याचप्रमाणे करोनाबरोबर राहणेही शक्य होईल. म्हणजेच गंभीर आजारपण, मृूत्यू हे होतच राहतील मात्र त्याचे प्रमाण हे पूर्वीपेक्षा खूपच कमी असेल, असे जॉन्सन यांचे सूचवायचे असण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.