न्यूयाॅर्क : भारताचा दिविज शरण आणि त्याचा न्यूझीलंडचा जोडीदार आर्टेम सिटाक यांना न्यूयाॅर्क ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरूष दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
शरण आणि सिटाक यांचा अमेरिकेच्या स्टीव जानसन आणि रेली ओपेलका या जोडीने ३-६, ४-६ असा पराभव केला.
https://twitter.com/NewYorkOpen/status/1227743227274498048?s=19
दरम्यान, याआधी दिविज आणि त्याचा न्यूझीलंडचा जोडीदार आर्टेम सिटाक या जोडीने अमेरिकेच्या आस्टिन क्राजिसेक आणि क्रोएशियाच्या फ्रैंको स्कुगोर या जोडीचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.
https://twitter.com/NewYorkOpen/status/1227040846744293376?s=19
शरण आणि सिटाक जोडीने पहिला सेट ७-६ तर दुसरा सेट ६-३ असा जिंकला होता. ही लढत जवळपास १ तास १९ मिनिटे चालली होती.